NewsWorld
PredictionsDigestsScorecardTimelinesArticles
NewsWorld
HomePredictionsDigestsScorecardTimelinesArticlesWorldTechnologyPoliticsBusiness
AI-powered predictive news aggregation© 2026 NewsWorld. All rights reserved.
Trending
AlsNewsFebruaryMajorDane'sResearchElectionCandidateCampaignPartyStrikesDigestSundayTimelinePrivateCrisisPoliticalEricBlueCreditFundingRamadanAdditionalLaunches
AlsNewsFebruaryMajorDane'sResearchElectionCandidateCampaignPartyStrikesDigestSundayTimelinePrivateCrisisPoliticalEricBlueCreditFundingRamadanAdditionalLaunches
All Articles
Fake Universities : देशात तब्बल ३२ बनावट विद्यापीठांचे जाळे ; यूजीसीने दिला सावधतेचा इशारा
prahaar.in
Published 2 days ago

Fake Universities : देशात तब्बल ३२ बनावट विद्यापीठांचे जाळे ; यूजीसीने दिला सावधतेचा इशारा

prahaar.in · Feb 20, 2026 · Collected from GDELT

Summary

Published: 20260220T063000Z

Full Article

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशात (Fake Universities) वाढत चाललेल्या बनावट विद्यापीठांच्या जाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी देशाच्या ८ राज्यांमध्ये बनावट विद्यापीठे होती. त्यात वाढ होऊन आता १२ राज्यात शिक्षण माफिया पोहचले आहेत. तर बनावट विद्यापीठांची संख्या २० वरून ३२ झाल्याचे यूजीसीने सांगितले आहे. यूजीसीने विद्यर्थी व पालकांना दिलेल्या इशाऱ्यात म्हंटले आहे की अशा बोगस संस्थांमध्ये कधीही प्रवेश घेऊ नये. बेंगळुरू, कर्नाटक येथील ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी नावाच्या फेक संस्थेच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूजीसीच्या संकेतस्थळावर फेक विद्यापीठांची पूर्ण यादी उपलब्ध असून प्रवेश घेण्यापूर्वी ती नक्की तपासावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. फेक विद्यापीठे गावोगावी आपले जाळे पसरवत आहेत आणि दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना फसवत आहेत. देशातील ३२ बोगस विद्यापीठांपैकी दिल्लीमध्ये १२ विद्यापीठे आहेत, काही संस्था तर यूजीसीच्या कार्यालयापासून फक्त काही मीटरवर आहेत. बनावट विद्यापीठांची माहिती:- दिल्ली (१२): ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्स, कर्मशियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, वोकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनीअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, अध्यात्मिक युनिव्हर्सिटी, वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशनल युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग, माउंटेन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्यूशन. पश्चिम बंगाल (२): इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन अँड रिसर्च उत्तर प्रदेश (४): गांधी हिंदी विद्यापीठ प्रयाग, महामाया टेक्नीकल युनिव्हर्सिटी नोएडा, नेताजी सुभाष चंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी, अलीगढ व भारतीय शिक्षा परिषद भारत भवन, लखनऊ हरियाणा (१): मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, फरीदाबाद झारखंड (१): दक्ष युनिव्हर्सिटी, रांची विदेशी विद्यापीठांच्या नावाखाली बोगस संस्थांनी जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, श्रीलंकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने यूजीसीकडे पत्र पाठवून महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या बोगस विद्यापीठाविरुद्ध तक्रार केली होती. विद्यार्थ्यांनी सतर्क राहून यूजीसीच्या अधिकृत यादीत नोंदलेलीच विद्यापीठे निवडावी, अन्यथा भविष्यात शिक्षण आणि करिअरवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.


Share this story

Read Original at prahaar.in

Related Articles

prahaar.inabout 20 hours ago
माझी वसुंधरा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Published: 20260221T153000Z

prahaar.in6 days ago
शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?

Published: 20260216T110000Z

prahaar.in7 days ago
मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक

Published: 20260215T163000Z

vimatisko.grabout 1 hour ago
Στο φαρμακείο της γειτονιάς αναζητούν όλα τα ακριβά φάρμακα οι ασθενείς με σοβαρές παθήσεις

Published: 20260222T103000Z

bildderfrau.deabout 1 hour ago
Medical Gaslighting : Wenn dir niemand glaubt , dass du krank bist

Published: 20260222T103000Z

andaluciainformacion.esabout 1 hour ago
Clínica Excelan : el valor de la atención médica personalizada en la Costa del Sol

Published: 20260222T103000Z