NewsWorld
PredictionsDigestsScorecardTimelinesArticles
NewsWorld
HomePredictionsDigestsScorecardTimelinesArticlesWorldTechnologyPoliticsBusiness
AI-powered predictive news aggregation© 2026 NewsWorld. All rights reserved.
Trending
TrumpTariffTradeFebruaryStrikesAnnounceLaunchNewsPricesMajorMilitaryHongKongCourtDigestSundayTimelineChinaTechSafetyGlobalMarketTestStocks
TrumpTariffTradeFebruaryStrikesAnnounceLaunchNewsPricesMajorMilitaryHongKongCourtDigestSundayTimelineChinaTechSafetyGlobalMarketTestStocks
All Articles
मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक
prahaar.in
Published 7 days ago

मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक

prahaar.in · Feb 15, 2026 · Collected from GDELT

Summary

Published: 20260215T163000Z

Full Article

मुंबई : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा जागतिक हवामान संवाद मुंबईत होणार आहे. शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक-आधारित हवामान मंचाचे केंद्रस्थान देणारा हा उपक्रम पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने आयोजित केला आहे. यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे मुख्य सत्र जिओ कन्व्हेशन सेंटर, मुंबई येथे होणार आहे. या तीन दिवसीय उपक्रमात तळागाळातील संस्था, विविध क्षेत्रातील नेते, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणकर्ते भारत व ग्लोबल साऊथमधील हवामान उपायांवर चर्चा करणार आहेत. जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व या मंचावर एकत्र येणार असून माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सौम्या स्वामिनाथन, उद्योग क्षेत्रातील एस्थर फिनिदोरी, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्यासह १०० हून अधिक संस्था आणि ४०० वक्ते सहभागी होणार आहेत. शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नोंदणीद्वारे सर्व हवामानप्रेमींसाठी प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. हब-अँड-स्पोक मॉडेल मुंबई क्लायमेट वीक ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने आयोजित केला आहे. मध्यवर्ती हबमध्ये नेतृत्व संवाद, विषयानुरूप सत्रे, एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज, यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज, ‘वातावरण’ या नागरिक व्यासपीठासह उपाययोजना प्रदर्शन भरवले जाणार आहे. या आठवड्यात शहरभर शाश्वत मेळावे, सार्वजनिक व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन, कला-सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील. राष्ट्रीय व जागतिक नेतृत्वाची उपस्थिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह उद्योगविश्वातील नोवेल टाटा, व्ही विद्यानाथन, अमित चंद्रा, अंकूर गुप्ता, जमशेद गोदरेज, नादिर गोदरेज, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे मार्टिन क्लायूस, सिंथिया मॅककॅफरे, अंजली रविकुमार, प्रतिक अग्रवाल, समीर शिसोदीया यांसारखे नेते हवामान कृतीतील भांडवली प्रवाह व धोरणांवर मत मांडणार आहेत. त्याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातून रोहिणी निलकेणी, मनोज कुमार, सत्यजित भातखळ, मृदुला रमेश, सीमा पौल, शिशिर सिन्हा आणि वीणा श्रीनिवासन यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर सहभागी होणार आहेत. नवोन्मेष, युवक नेतृत्व आणि नागरिक सहभाग नवोन्मेष हा या आठवड्याचा केंद्रबिंदू आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांच्या भागीदारीत एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज आयोजित होणार असून स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि नागरी संस्थांना हवामान उपाय मांडण्याची संधी मिळेल. युनिसेफ इंडिया आणि युवाह यांच्या सहकार्याने युवकांसाठी कॅम्पस रोडशो आणि स्पर्धा होणार आहेत. 16 ते 24 वयोगटातील युवकांचे प्रकल्प धोरणकर्त्यांसमोर सादर केले जातील. प्रदर्शन आणि समुदाय उपक्रम हबमध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उद्योग, स्टार्टअप्स आणि स्वयंसेवी संस्था हवामान उपाय सादर करतील. गोदरेज ग्रुप, आयडीएफसी फर्स्ट बँक, महिंद्रा ग्रुप, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि मिरिक टेक यांसारख्या संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप व उपाय पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि ग्लोबल साऊथसाठी नवा हवामान मंच मुंबई क्लायमेट वीक हा नागरिक सहभाग, सार्वजनिक-खासगी-लोक भागीदारी आणि शहरस्तरीय अंमलबजावणीवर आधारित भारतीय मॉडेल सादर करतो. हवामान कृतीत भारताच्या नेतृत्वाची दिशा दाखवणारा हा उपक्रम वार्षिक स्वरूपात पुढे नेण्याचा मानस आहे. तीनही विषयक स्तंभ आणि सत्रांची सविस्तर माहिती https://www.mumbaiclimateweek.com/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Share this story

Read Original at prahaar.in

Related Articles

prahaar.inabout 21 hours ago
माझी वसुंधरा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Published: 20260221T153000Z

prahaar.in2 days ago
Fake Universities : देशात तब्बल ३२ बनावट विद्यापीठांचे जाळे ; यूजीसीने दिला सावधतेचा इशारा

Published: 20260220T063000Z

prahaar.in6 days ago
शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?

Published: 20260216T110000Z

Euronewsabout 1 hour ago
Pope Leo XIV: 'No change in Church doctrine on gays and trans people'

The Pontiff has dismissed any immediate prospect of change in the Vatican's stance on LGBT+ rights. It's one of many views he's discussed openly with Vaticanist Elise Ann Allen that are contained in a new book "Pope Leo XIV - The Biography."

Wiredabout 1 hour ago
What to Know About At-Home STI Tests: Pros, Cons, and Recommendations (2026)

It's easier than ever to test for sexually transmitted infections at home. We break down whether or not you should.

Engadgetabout 1 hour ago
2026 Olympics: How to watch the Winter Games Closing Ceremony today

The Closing Ceremony for the 2026 Winter Games is this Sunday. (Li Jing/Xinhua via Getty Images) The 2026 Winter Olympics come to an end this weekend. This year's Closing Ceremony theme is "Beauty in Action." The event will feature appearances from musician and DJ Gabry Ponte, actress Benedetta Porcaroli, and ballet dancer Roberto Bolle. Alfredo Accatino, the ceremony's artistic director, has promised the ceremony will "begin with lots of colors and end with a party." The ceremony will kick off today at 2:30PM ET on NBC and Peacock. An encore broadcast will air on NBC at 9PM Here's everything you need to know to watch the 2026 Milan Cortina Olympics Closing Ceremony. (And as we close out the Winter Games, here's a look at the final medal count, too.)  How to watch the Closing Ceremony at the 2026 Winter Olympics Date: Sunday, Feb. 22 Time: Airs live at 2:30PM ET; primetime re-air at 9PM ET Location: Verona Arena, Verona, Italy TV channel: NBC Streaming: Peacock, DirecTV, NBC.com and more Olympics Closing Ceremony start time The ceremony will kick off at 2:30 PM ET on Sunday afternoon. An encore broadcast will also air on NBC at 9PM ET/PT.  How to watch the Closing Ceremony live for free There are a couple of ways to watch the 2026 Milan Cortina Winter Olympics Closing Ceremony on Sunday, Feb. 22. You can tune in live Sunday afternoon on NBC or stream live on Peacock, or catch the encore broadcast on NBC, which is available with DirecTV, Hulu + Live TV, and more. More ways to watch the closing ceremony without cable You can watch the ceremony live or on demand on Peacock as well as on NBC.com, NBCOlympics.com and the NBC app. Who is performing at the Closing Ceremony? Italian musician and DJ Gabry Ponte is one of the headliners. Other confirmed performers include Italian actress Benedetta Porcaroli and Italian ballet dancer Roberto Bolle. Expect to see another parade of athletes, the fla