NewsWorld
PredictionsDigestsScorecardTimelinesArticles
NewsWorld
HomePredictionsDigestsScorecardTimelinesArticlesWorldTechnologyPoliticsBusiness
AI-powered predictive news aggregation© 2026 NewsWorld. All rights reserved.
Trending
TariffTrumpTradeAnnounceNewsLaunchPricesStrikesMajorFebruaryCourtDigestSundayTimelineSafetyGlobalMarketIranianTestTechChinaMilitaryTargetsJapan
TariffTrumpTradeAnnounceNewsLaunchPricesStrikesMajorFebruaryCourtDigestSundayTimelineSafetyGlobalMarketIranianTestTechChinaMilitaryTargetsJapan
All Articles
शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?
prahaar.in
Published 6 days ago

शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?

prahaar.in · Feb 16, 2026 · Collected from GDELT

Summary

Published: 20260216T110000Z

Full Article

शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ? February 16, 2026 02:20 PM भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे शरसंधान स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव्ह करणारे उद्धव ठाकरे 3 दिवस उलटले तरी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार नाही, हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरेंची दातखीळ बसली आहे का? छत्रपतींचा अवमान होत असताना उद्धव ठाकरे यांनी निषेध का केला नाही असे परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केले. उद्धव ठाकरेंमध्ये स्वाभिमान, थोडी जरी धमक शिल्लक असेल तर उबाठा गटाने हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करावे असे आव्हान बन यांनी दिले. टिपू सुलतानवरून भाजपावर टीका करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत बन म्हणाले की, भाजपाचे धोरण स्पष्ट आहे. जो या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करतो, हिंदू मंदिरांची तोडफोड करतो, हिंदू आया बहिणींवर ज्याने बलात्कार केले, त्या टिपू सुलतानचे समर्थन भाजपा कधीच करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना मालवणी मध्ये पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न केला होता. त्याची आठवण करून देत बन म्हणाले त्यावेळी या विरोधात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजपा नेते मंगल प्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर, तेजिंदर तिवाना यांनी प्रखर विरोध केला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या पण त्या मैदानाला टिपू सुलतानचे नाव देऊ दिल नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आंदोलन करणा-या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे हीन काम केलं होते असे टीकास्त्र बन यांनी सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना संजय राऊत त्याचा संबंध निवडणुकांशी जोडायचा घाणेरडा प्रयत्न करत आहेत, राजकारण करत आहेत. भाजपासाठी शिवरायांचा अपमान हा निवडणुकीचा विषय नाही, अस्मितेचा विषय आहे. निवडणूक पाहून आंदोलन करणे भाजपाच्या तत्वात बसत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांचा सन्मान राखू असे बन यांनी निक्षून सांगितले. सपकाळांनी महाराष्ट्राची माफी मागावी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा कदापि सहन करणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन अटळ आहे असा इशारा बन यांनी दिला. मनी लॉन्ड्रिंगमध्ये काँग्रेस एक्सपर्ट मनी लॉन्ड्रींग करण्याचे उद्योग कर्नाटक सरकार करत आहे तसेच केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार होते तेव्हाही मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यांचे प्रकार उघडकीस आले होते. काळा पैसा पांढरा कसा झाला हे मल्लिकार्जून खरगे यांनी चिदंबरम यांना विचारायला हवे असा टोलाही बन यांनी लगावला. भाजपाच्या गणेश नाईकांना त्यांनी पुन्हा शिवसेनेत परतावे असा सल्ला देणा-या राऊतांना सणसणीत चपराक मारत बन म्हणाले की, राऊत आपली खासदारकी संपली की खासदारकीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लाऊन बसणार आहेत हे महाराष्ट्राला देखील माहीत आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये पुण्याचे रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा महायुती सरकार संवेदनशील असून लवकरच त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचा भाजपाचा निर्धार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने नोकरी देण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे बन म्हणाले . Tags प्रहार ई-पेपर


Share this story

Read Original at prahaar.in

Related Articles

prahaar.inabout 22 hours ago
माझी वसुंधरा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Published: 20260221T153000Z

prahaar.in2 days ago
Fake Universities : देशात तब्बल ३२ बनावट विद्यापीठांचे जाळे ; यूजीसीने दिला सावधतेचा इशारा

Published: 20260220T063000Z

prahaar.in7 days ago
मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक

Published: 20260215T163000Z

curierulnational.roabout 1 hour ago
România accelerează bugetarea verde . Etichetarea cheltuielilor bugetare și fiscale pentru anul 2025 a fost finalizată cu succes

Published: 20260222T124500Z

stiripesurse.roabout 1 hour ago
Schimbările climatice impun investiții masive în infrastructura hidrotehnică

Published: 20260222T124500Z

dimokratiki.grabout 1 hour ago
Χάρης Θεοχάρης : Θετική ατζέντα χαμηλής πολιτικής με την Τουρκία

Published: 20260222T123000Z