
lokmat.com · Feb 20, 2026 · Collected from GDELT
Published: 20260220T111500Z
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:32 IST2026-02-20T15:31:38+5:302026-02-20T15:32:21+5:30Bangladesh Election News: २०२४ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर सुमारे दीड वर्षाने बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर बांगलादेशमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. BNP ने निवडणूक जिंकण्यासाठी भारतासोबत हातमिळवणी केली, बांगलादेशमधील विद्यार्थी नेत्याचा आरोप २०२४ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर सुमारे दीड वर्षाने बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर बांगलादेशमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. तसेच विद्यार्थी नेते, एनसीपीचे संयोजक आणि विरोधी पक्षांचे चिफ व्हिप नाहिद इस्लामने निवडणूक जिंकलेल्या बीएनपीवर गंभीर आरोप केले आहेत. बीएनबीने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भारत आणि अवामी लीगसोबत हातमिळवणी केली, असा आरोप त्यांनी केला आहे.यावेळी नाहिद इस्लाम म्हणाले की, जर व्होट बँकेच्या राजकारणासाठी अवामी लीगला बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला, तर जनता त्याला तीव्र विरोध करेल. तसेच देशातील जनता कुठल्याही प्रकारच्या राजकीय पुनर्वसनाच्या प्रयत्नांना स्वीकार करणार नाही. तसेच लोकशाही पद्धतीने याचा विरोध केला जाईल.नाहिद इस्लामने सांगितले की, जर सरकार अवामी लीगविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरलं, तर याची पूर्ण जबाबदारी ही सरकारवर असेल. तसेच जर अवामी लीगला पुन्हा संघटित करण्याचा प्रयत्न झाला, तर आमचा पक्ष याला व्यापक पातळीवर विरोध करेल. Web Title : बीएनपी पर चुनाव जीतने के लिए भारत से मिलीभगत का आरोप Web Summary : बांग्लादेशी छात्र नेता नाहिद इस्लाम ने आरोप लगाया कि बीएनपी ने चुनाव जीतने के लिए भारत और अवामी लीग के साथ साझेदारी की। उन्होंने अवामी लीग को फिर से स्थापित करने के खिलाफ चेतावनी दी और ऐसी किसी भी राजनीतिक पुनर्वास का कड़ा विरोध करने का वादा किया। सरकार की निष्क्रियता के लिए जवाबदेह ठहराया जाएगा। Web Title : BNP Accused of Colluding with India to Win Election. Web Summary : Bangladeshi student leader Nahid Islam alleges BNP partnered with India, Awami League to win elections. He warns against re-establishing Awami League, promising strong opposition to any such political rehabilitation. Government inaction will be held accountable.