divyamarathi.bhaskar.com · Mar 1, 2026 · Collected from GDELT
Published: 20260301T014500Z
19 व्या शतकात महाराष्ट्रात सामाजिक जागृतीची एक नवी पहाट उगवत होती. यामुळे रूढी परंपरांच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला नव्या विचारांची चाहूल लागली होती. अशा काळात एक जिद्दी तरु आपले अपार कष्ट, अभ्यासू वृत्ती व समाजनिष्ठेच्या जोरावर इतिहासाच्या पानावर आ.सामाजिक सुधारणांच्या लढ्यात खंबीरपणे उभे राहात या तरुणाने समाजाला नव्या अंगाने विचार करण्यास भाग पाडले. हा तरुण म्हणजे भाऊ दाजी लाड. आज 'धुरंधर'मध्ये जाणून घेऊया ज्ञान, जिद्द व समाजसेवेचा खरा दीपस्तंभ असणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी जीवनकथा...भाऊ दाजी लाड यांचा जन्म अन् शिक्षणडॉक्टर भाऊ दाजी लाड अर्थात रामकृष्ण विठ्ठल लाड यांचा जन्म 1822 साली गोव्यातील मांजरे नामक एका छोट्याशा गावात झाला. भाऊंच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे त्यांचे वडील कामधंद्याच्या शोधात मुंबईला आले. तिथे त्यांनी मातीची खेळणी विकून आपला रहाटगाडा चालवला. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे मुंबई हीच त्यांची कर्मभूमी झाली. भाऊंचे लग्न पार्वतीबाई नामक तरुणीशी झाले.भाऊ दाजी लाड यांचे पदवीचे शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन शिक्षण संस्थेतच शिक्षक म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1851 मध्ये वैद्यकीय पदवी घेतली. काही दिवस ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. ते आपल्या काळातील नामांकित डॉक्टरांपैकी एक होते. ते 'डॉक्टर भाऊ दाजी लाड' या नावाने अधिक प्रसिद्ध होते.भाऊंनी वाड्मय व संशोधन क्षेत्रात भरीव स्वरुपाची कामगिरी केली. पुराणेतिहासिक संशोधक म्हणून केलेल्या कार्यामुळे त्यांना भारतासह परदेशातही प्रसिद्धी मिळाली. त्यांनी कालिदासाचा कालनिर्णय या संशोधनविषयक निबंधनाने आपल्या कार्याला सुरुवात केली होती. कवी मुकुंदराज हेमाद्रीचा काल, हेमचंद्र माधव व सायण तसेच जैन धर्माची परंपरा इत्यादी विषयांवरील त्यांची टिपणे आजही अनेक अभ्यासकांना उपयुक्त ठरतात.निबंधाला मिळाले होते पहिले बक्षीसभाऊ दाजी लाड कॉलेजमध्ये असताना त्यांनी राजस्थान व गुजरात या भागातील मुलींना गर्भावस्थेत मारुन टाकण्याच्या प्रथेवर परिस्थिती सांगणारा एक निबंध लिहिला. तो उत्कृष्ट ठरून त्यांना त्या वेळचे 600 रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याबद्दल फिशर शिष्यवृत्तीही मिळाली.दादाभाई नौरोजींशी होते सख्यभाऊ दाजी लाड यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ते त्या काळातील प्रमुख सामाजिक व राजकीय घडामोडींत हिरीरीने सहभाग होत. त्यांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिला. तसेच परदेश प्रवासावर असलेल्या धार्मिक बंदीविरोधातही लढा दिला.मराठीसह गुजराती, इंग्रजीवरही प्रभूत्वभाऊंचे मराठीसह गुजराती व इंग्रजी भाषेवरही प्रभूत्व होते. ते या भाषेत उत्तम भाषणे देत. त्यांनी नाट्यकलेला प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी भाऊंना पहिल्या दर्जाचा रसिक म्हणून मान दिला.कुष्ठरोगावर औषध शोधून प्रभावी उपचारभाऊंनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटीमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. त्यामुळे त्यांच्याकडे पैशांचा ओघही सुरू झाला. त्यातून त्यांनी संशोधनकार्याला सुरुवात केली. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नामक वनस्पतीच्या बियांपासून औषध शोधू काढले. खष्ठ म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे. ते या बिया गोळा करण्यासाठी देशभर फिरत. महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार करत. यासोबतच गर्भवतींची सुखरूप सुटका करण्यातही भाऊंची ख्याती होती. देवी टोचण्याची पद्धत त्यांनीच लोकप्रिय केली.असे म्हटले जाते की, भाऊंना त्यांचे शिक्षक डॉक्टर मोरहेड यांनी कुष्ठरोगाच्या उपचारांवर अभ्यास करण्यास सूचवले होते. त्यानुसार त्यांनी कुष्ठरोगावर काम सुरू केले. जे जे हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर वॉर्ड उपलब्ध करून देण्याची त्यांनी विनंती केली. प्रारंभी त्यांची ही विनंती फेटाळण्यात आली. पण 1868 मध्ये त्यांना कुष्ठरोगाच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. त्यापैकी एकाचा देवीच्या रोगाने मृत्यू झाला.आणखी 2 जण शिल्लक राहिले. पोलिस अधीक्षक सी. हॅलम्स यांच्या मुलासह 4 रुग्णांना उल्लेखनीय आराम मिळाला. यामुळे कुष्ठरोग बरा करण्याची त्याची ख्याती सर्वदूीर पोहोचली. देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण त्यांच्याकडे मोठ्या आशेने येऊ लागले. भाऊंनी त्यांच्यासाठी व्यवस्था केली आणि त्यांची विशेष काळजी घेतली. निकालाने समाधान झाल्यानंतर भाऊंनी आपले औषध रत्नागिरी येथील कुष्ठरोग रुग्णालयात चाचणीसाठी पाठवले. त्यांनी उपचारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या कुष्ठरोगींचे फोटो जतन केले. नंतरच्या काळात कुष्ठरोगावरील त्यांचे उपचार वैद्यकीय जगतात चर्चेचा विषय बनले.भाऊंच्या कुष्ठरोग उपचार पद्धतीवर होते मतभेदभाऊ दाजींच्या कुष्ठरोग उपचार पद्धतीवर वेगवेगळे मतप्रवाह होते. समकलीन वैद्यकीय साहित्यातून स्पष्ट होते की, ही लाट इंग्लंडपर्यंतही पोहोचली होती. प्रकरणांची वैयक्तितरित्या तपासणी करणारे युरोपियन डॉक्टरांचे प्रमाणपत्र व पद्धतीच्या समर्थनार्थ रुग्णांचे स्वतःचे निवेदन या प्रक्रणी उपलब्ध होते. पण पाश्चात्य राष्ट्रातील काही प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ इरास्मस विल्सन व इतर तज्ज्ञ भाऊंच्या उपचारांच्या यशाबद्दल साशंक होते.त्यामुळे भाऊंनी याविषयीचे वाद व संशय दूर करण्यासाठी निकाल प्रकाशनाच्या योजनेसह एकत्रित करण्यास सुरुवात केली. पण दुर्दैवाने त्यांना अचानक आलेले आजारपण व मृत्यूमुळे ते प्रत्यक्षात आले नाही. 5 जून 1874 च्या टाईम्स ऑफ इंडियामधील मृत्युलेखात नमद आहे की, आजारी असताना ते त्यांचे हस्तलिखित गोळा करून प्रकाशनासाठी तयार व्हावे यासाठी सर्वात जास्त उत्सुक होते.समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांचा त्याग केल्याशिवाय आपल्या लोकांचा उद्धार होणार नाही असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी समाजसुधारणेसाठी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले. यासंबंधीचा भाऊंचा एक किस्सा सांगितला जातो. 1860-70 च्या दशकात एका भोंदू बाबांविरोधात करसनदास मुळजी यांनी खटला चालवला होता. त्यात भाऊंची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली होती.भाऊ इंग्रजी राजवटीचे समर्थक होते का?काही संशोधकांच्या मते, भाऊ इंग्रजी राजवटीचे समर्थक होते. पण त्यांची भूमिका ही त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरूनच होती. इंग्रजी राजवटीमुळे आपल्या लोकांसाठी प्रगतीची कवाडे उघडली जात आहेत असे त्यांचे प्रामाणिक मत होते. पण इंग्रजांचे समर्थन करताना त्यांनी भारतीय जनतेच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही. उलट येथील लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे असा आग्रह धरून त्यांनी बरेच प्रयत्न केले.मुंबईतील पहिल्या विधवा पुनर्विवाहाला उपस्थितीभाऊंनी जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झिज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे मुलींच्या 3 शाळा चालवल्या जात. विधवा विवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे व अंधश्रद्धेला फाटा द्यावा या मताचे ते होते. 1869 साली मुंबईत झालेल्या पहिल्या विधवा पुनर्विवाहाला ते जातीने उपस्थित होते.मॅक्स मुलर एकेठिकाणी भाऊंविषयी म्हणतात, मी नेहमीच डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याकडे एक असा माणूस म्हणून पाहतो, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी थोडे लिहिले असले तरी त्यांनी लिहिलेले थोडेस इतरांनी लिहिलेल्या हजारो पानांपेक्षा चांगले आहे.मुंबईतील पहिली सूतगिरणी सुरूभाऊंनी सुताच्या व कापडाच्या गिरणीची संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्या कल्पनेला कावसजी नानाभाई दावर यांनी मूर्त स्वरुप देऊन मुंबईतील पहिली सूतगिरणी 1854 साली सुरू केली.लायसेन्स बिल1859 साली इंग्रज सरकारने व्यापार व व्यवसाय यांच्यावर कर लावण्यासाठी लायसेन्स बिल सादर केले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी मुंबईतील सर्व प्रतिष्ठित नागरिकांची एक सभा भरली होती. त्यात भाऊंनी सरकारविरोधात संघर्षाची भूमिका न घेता आपण आपले म्हणणे मांडावे अशी भूमिका घेतली. त्याला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. त्यानंतर आपल्या मागण्यांचा अर्ज तयार करण्याची जबाबदारी भाऊंच्या खांद्यावर येऊन पडली. भाऊंनी तो अर्ज 5 हजार स्वाक्षऱ्यांनिशी ब्रिटिश सरकार दरबारी पाठवला.प्राचीन वारशाचा शोधभाऊ दाजी लाड 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेचे सचिव होते. तसेच दादाभाई नौरोजींच्या ईस्ट इंडिया असोसिएशनचीही त्यांचा संबंध होता. त्यांचे आणखी एक मोठे योगदान म्हणजे त्यांनी संस्कृत, पाली व अरबी भाषेतील प्राचीन हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशात आणण्याचे काम केले. त्या काळापर्यंत या क्षेत्रात प्रामुख्याने परदेशी विद्वानच काम करत होते. पण भाऊंनी देशभर फिरून प्राचीन सभ्यता व संस्कृतीवर प्रकाश टाकणारी सामग्री गोळा केली. त्यांनी प्राचीन गुहा व मंदिरे भेटून तेथील भित्तीचित्रे, शिलालेख, ताम्रपट इत्यादींचा संग्रह केला.याच कारणामुळे प्रसिद्ध इतिहासकार रामकृष्ण गोपाल भांडारकर यांनी म्हटले होते की, जर कुणाला भारताच्या मागील 2 हजार वर्षांबद्दल काही लिहायचे असेल, तर त्याला डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची मदत घ्यावीच लागेल.चलनी नाणे, जुने शिलालेख व ताम्रपटांवरील एक विशिष्ट चिन्ह एक संख्या दर्शवते. त्या संख्येवरून निश्चित काळ समजून येतो, हा भाऊंचा निष्कर्ष सर्वमान्य झाला आहे. भायखळ्यातील प्रसिद्ध राणीची बाग म्हणजे आताचे वीर जिजामाता उद्यान स्थापन करण्यात भाऊंचा पुढाकार होता. 1974 साली बागेतील संग्रहालयाचे नामकरण करून डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रालय असे करण्यात आले.उतारवयात करावा लागला आर्थिक तंगीचा सामनाभाऊ दाजी लाड संग्रहालय, मुंबईमुंबई स्थित रॉयल एशियाटिक सोसायटी या संस्थेचे भाऊ दाजी लाड सभासद होते. त्यांनी अनेक शिलालेखांचे वाचन करून आपले संशोधनविषयक लेख रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमधून प्रसिद्ध केले. त्यांनी अनेक ब्रिटिश इतिहासकारांच्या, संशोधकांच्या चुका दाखवण्याचे धाडस दाखवले. त्यांना भारताचा इतिहास लिहायचा होता. त्यासाठी त्यांनी काही लिखानही केले होते. पण दुर्दैवाने त्यांना फार मोठे आयुष्य लाभले नाही.भाऊंना आपल्या उतारवयात जबर आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध संपल्यानंतर त्यांना व्यवसायात प्रचरंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना ग्रंथालय व घरदार विकावे लागले. त्यातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी ज्यांना मदत केली, ज्यांच्यासाठी काही उपक्र सुरू केले, त्यांनी भाऊंकडे दुर्लक्ष केले. अनेक नामवंतांनी त्यांचा द्वेषही केला. त्यात काही परदेशी व देशी व्यक्तींचाही समावेश होता. त्यांनी त्यांचे पाय मागे खेचले. त्यातच 31 मे 1874 साली त्यांचे निधन झाले.थोडक्यात, संशोधन, वैद्यक व समाजसुधारणेचा त्रिवेणी संगम असणारे भाऊ दाजी लाड हे केवळ एका क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व नव्हते; तर ते आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीचा एक भक्कम पाया होते, हेच या निमित्ताने म्हणता येईल.धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा…धुरंधर-64; दुर्गाबाई देशमुख:राष्ट्रसेवेची अखंड ज्योत असणाऱ्या फ्रॉकवाल्या छोट्या शिक्षिकेची निष्ठा अन् निडरपणाची गोष्टधुरंधर-63; वासुदेव सीताराम बेंद्रे:शिवजयंतीची तारीख निश्चित करणारा अन् शंभूराजांचे ऐतिहासिक पुनर्वसन करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्यधुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:'दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत' असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षीधुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्या